मला पक्षाकडून निरोप दिले जात नाही’, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी

medha Kulkarni

पुणे : सध्या पक्षाकडून अनेक आंदोलन आणि बैठका घेतल्या जात आहेत. मात्र मला त्याचे निरोप दिले जात नाही. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात, त्याचाही निरोप दिला जात नाही, आजच्या आंदोलनाचाही मला निरोप पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे म्हणत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. यानंतर भाजपकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. आणि अशातच त्या मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत होत्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मेधा कुलकर्णी यांनी बातचीत केली.

यावेळी मेधा कुलकर्णी यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखविली. पक्षाने मला विधान परिषदेचा शब्द दिला होता. आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. या सर्व गोष्टी मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घातल्या आहेत. माझ्या मनात असलेले प्रश्न मी पक्षालाचा विचारेन. मात्र, आगामी काळात पक्ष माझ्यावर जबाबदारी देईल, अशी आशा मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच मी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नसल्याचेही मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER