सुनील गावसकर म्हणतात, बाळाच्या आगमनावेळी आपण परतण्याची परवानगीच मागितली नव्हती

विराट कोहलीच्या (Virat Kohli) पितृत्व रजेची (Paternity leave) चर्चा आहे आणि तो खेळ व करियरसोबत कुटुंबालाही प्राधान्य देत असल्याबद्दल त्याचे कौतुकही होत आहे मात्र, त्यासोबतच काळ किती बदललाय अशीसुध्दा चर्चा आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कितीतरी महिने आपल्या मुलाचा, रोहनचा, चेहरासुध्दा बघितला नव्हता अशी माहिती कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. यासंदर्भात सुनील गावसकर यांना 1975-76 च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर गावसकर यांना मंडळाने (BCCI) मायदेशी परतण्यास परवानगी नाकारली होती अशी माहिती पसरली आहे. मात्र आता स्वतः सुनील गावसकर यांनी ही माहिती असल्याचे स्पष्ट केले आहे.

हा गैरसमज दूर करताना गावसकर यांनी म्हटले आहे की, तसे काहीच नव्हते कारण मुळात मी घरी परतण्याची परवानगीच मागितली नव्हती. संघासाठी खेळायला माझे प्राधान्य होते आणि माझ्या पत्नीचा माझ्या या निर्णयाला पाठिंबा होता.

गावसकर यांनी आपल्या स्तंभात म्हटलेय की, मी बाळाच्या जन्मावेळी पत्नीसोबत राहण्यासाठी परतण्याची परवानगीच मंडळाकडे मागितली नव्हती. 1975-76 च्या न्यूझीलंड व वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होतानाच मला माहित होते की आपण परदेशात असतानाच बाळाचे आगमन होईल. पण मी देशासाठी खेळायला कटीबध्द होतो आणि माझ्या कुटुंबाचा त्या निर्णयाला पाठिंबा होता.

न्यूझीलंडविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीत गावसकर यांना दुखापत झाली आणि त्यांना काही आठवड्यांची विश्रांती सांगण्यात आली. चार आठवड्यांचा अवधी सांगण्यात आला होता. आणि पुढचा कसोटी सामना तीन आठवड्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये हौता. मध्यंतरीच्या काळात आपण खेळू शकणार नव्हतो म्हणून आपण मॕनेजर पॉली उम्रीगर यांना विनंती केली होती की, आपण स्वतःच्या खर्चाने काही दिवस मायदेशी परतून पुन्हा संघाला वेस्ट इंडिजमध्ये जाॕईन करु शकतो का? विंडीजविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी आपण संघात पुन्हा दाखल होणार होतो त्यामुळे सामना खेळू शकणार नसल्याचा प्रश्नच नव्हता आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही आपण पहिल्या कसोटी सामन्यात खेळलो होतो, असे गावसकरांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER