१२ कंपन्या लसीचे उत्पादन करत असल्याचे मला माहिती नव्हते; नितीन गडकरींची प्रांजळ कबुली

नवी दिल्ली :- देशात लसीचा तुटवडा सर्वत्र ठिकणी जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाऐवजी १० कंपन्यांना लसनिर्मितीचे लायसन्स दिले पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राला केली होती. मात्र, सरकारने आधीच हा निर्णय घेतल्याचे समजल्यानंतर गडकरी यांनी सारवासारव केली आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दलची मला माहिती नव्हती, अशी प्रांजळ कबुली नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.

याबाबत नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही प्रामाणिकपणे कबुली दिली आहे. “१२ कंपन्या लसीचे उत्पादन करण्याचे काम करत आहेत. सरकारच्या या निर्णयाची मला माहिती नव्हती. पत्रकार परिषदेनंतर मला माहिती देण्यात आली.” असे गडकरी यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आता विरोधाकांचीही इच्छा ‘गडकरी पंतप्रधान व्हावेत’

“स्वदेशी जागरण मंचच्या पत्रकार परिषदेत मी काल भाग घेतला. त्यावेळी मी एकाऐवजी १० कंपन्यांना लसनिर्मितीचे लायसन्स द्या आणि भारतात वॅक्सिनचा पुरवठा करू द्या. त्यानंतर वॅक्सिन जास्त असतील तर त्या निर्यात करा, असा सल्ला मी दिला होता. मात्र, हा निर्णय खते आणि रसायन मंत्रालयाने आधीच घेतला आहे. यावर कामही सुरू झाल्याचे मला माहीत नव्हते. याबाबत पत्रकार परिषदेनंतर मला सांगितले गेले. १२ कंपन्यांनी लसीचे उत्पादन सुरू केल्याची माहिती मला देण्यात आली. याबाबत मला माहीत नसल्यामुळे मी सल्ला दिला होता. मात्र, केंद्राने आधीच योग्य पाऊल उचलले. त्याचा मला आनंदच आहे.” असे गडकरी म्हणाले.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button