मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो ; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत संताप अनावर

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली असून यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का, असं विचारण्यात आलं असता मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो, असे म्हणत काही काळासाठी त्यांचा पत्रकार परिषदेत संताप अनावर झाला होता.

मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही. लोकसत्ताच्या मुलाखतीतही हे सांगितलं होतं. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही. मी काही नवाज शरीफला (Nawaz Sharif) भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं असेल असं सांगितले तर त्यात चुकीचे काय? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button