मी कधीच सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाही : करीना कपूर

kareenA

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर हिने आपली सावत्र मुलं सारा अली खान आणि इब्राहम खान यांच्याशी असलेल्या नात्यावर भाष्य केले आहे. सारा आणि इब्राहम यांची मी कधी आई होऊ शकत नाही असे ती म्हणाली आहे.

ही बातमी पण वाचा : अमिताभ बच्चन यांनी यूपीतील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले

‘मी आणि सारा-इब्राहिम केवळ चांगले मित्र होऊ शकतो. मी त्यांची आई कधीही बनू शकणार नाही, हे मी सैफला लग्नाआधीच सांगितले होते. कारण सारा व इब्राहिमजवळ आधीच अमृतासारखी चांगली आई आहे. तिने त्या दोघांना अतिशय प्रेमाने वाढवले आहे. मी केवळ सारा व इब्राहिमला प्रेम करू शकते. त्यांची मैत्रिण बनू शकते. त्यांची आई होणे मला जमणार नाही. त्यांना जेव्हा केव्हा माझी मदत आणि सल्ला लागेल, त्यावेळी मी कायम त्यांच्यासोबत असेल,’असे करिना यावेळी म्हणाली. सारा लवकरच केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ही बातमी पण वाचा : #MeToo : आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल