ही नायिका म्हणते, रणबीर कपूरमुळे मी चांगली आई होऊ शकते

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माने त्यांच्या या पहिल्या मुलीचे नाव वामिका (Vaamika) ठेवले. त्यानंतर आता काही काळ आराम केल्यानंतर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा कामावर परतली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका जाहिरातीचे शूटिंग केले. खरे तर हे शूटिंग केल्याने अनुष्का ट्रोल झाली होती. याचे कारण होते तिची एक जुनी मुलाखत. या मुलाखतीत तिने आई झाल्यानंतर काम करणार नसल्याचे म्हटले होते. अशाच प्रकारे आता अनुष्काची आणखी एक जुनी मुलाखत समोर आली असून यात ती, रणबीर कपूरमुळे (Ranbir Kapoor) मी चांगली आई होऊ शकते असे बोलत असल्याचे दिसत आहे.

अनुष्का शर्माची ही मुलाखत २०१५ मधली आहे. अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) ‘बॉम्बे वेलवेट’ सिनेमात एकत्र काम करीत असताना अनुष्काने दिलेल्या मुलाखतीत हा उल्लेख आहे. या मुलाखतीत अनुष्काने म्हटले होते, रणबीर कपूरसोबत वागून आणि त्याच्या खोड्या पाहून मी आता खूपच हुशार झाले असून आता मी लहान मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. रणबीर कपूरचा स्वभाव एखाद्या लहान मुलासारखा चौकस आहे. त्याला सगळे काही माहिती करून घ्यायचे असते. मी मेकअप करीत असताना तो माझ्या मेकअप रूममध्ये यायचा आणि माझे सगळे ड्रॉव्हर खोलून बघायचा. माझी हँडबॅगही खोलायचा आणि सगळ्या वस्तू काढून त्याबाबत बोलत बसायचा. एवढेच नव्हे तर मी जर फोनवर असेन तर तो माझा फोन घेऊन मी फोनवर काय करते ते पाहायचा. लहान मुले अशीच करतात. त्यामुळे मी एक चांगली आई बनू शकते कारण माझ्याकडे रणबीर कपूर आहे.’ असे बोलताना अनुष्का दिसत आहे.

या सिनेमानंतर अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘ऐ दिल है मुश्किल’मध्येही एकत्र काम केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button