शरद पवारांवर माझा पहिल्यापासून विश्वास – संजय राऊत

Sanjay Raut-Sharad Pawar

नवी दिल्ली : महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि अरविंद सावंत यांचा सत्कारही करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

“संजय राऊत म्हणाले, ‘ डर के आगे जीत है…! महाराष्ट्राने डर को खतम किया… महाराष्ट्राने भिती मारली…! महाराष्ट्राने देशाला दिशा दिला. आता देशातील इतर राज्यातीले नेते ही म्हणतायेत ये हमारे यहा भी हो सकता है..! हा ३६ दिवसांचा जो राजकिय खेळ होता तो कमिटमेंटचा खेळ होता. हे वक्तव्य राऊत यांनी केले.

“मी रोज स्वप्नात पण बडबडायचो. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. मला घरचे म्हणायचे यांना वेड लागलं आहे का? सामनामध्ये आलो की चिंता करु नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. बाहेर गेलो तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असे सांगायचो. शेवटपर्यंत ही गोष्ट आपण पुढे नेली. हा सिनेमा म्हणा किंवा एक भयपट म्हणा. रोमांचक किंवा रहस्यपट म्हणा.” असेही ते यावेळी म्हणाले.

“गेल्या ३० ते ३५ दिवसांचा जो आपला काही दशावतार कार्यक्रम झाला. मी त्याला कार्यक्रमच म्हणतो. तो रोमांचक होता. एखादा थ्रिलर सिनेमा असतो ना आता काय होईल संध्याकाळी काय होईल दुपारी काय होईल. आम्ही पवारांकडे जायला निघायचो. तेव्हा लोकांना वाटायचं की इथे उलटं होईल की सुलटं होईल. टोपी लागेल किंवा टोपी लावतील. पण यातही आपण ३० ते ३५ दिवस काढले. कोणाचाही विश्वास नव्हता काय होईल.” असेही संजय राऊत म्हणाले.

“जोपर्यंत शरद पवारांना खात्री आहे हे होणार. उद्धव ठाकरेंचा विश्वास आहे तर हे होणार. जोपर्यंत त्यांनी युद्ध थांबवू नका असे आदेश दिले. तोपर्यंत होणार. आणि ती वेळ आली. महाराष्ट्रात जे परिवर्तन झाले. त्याने देशालाही दिशा दिली.” असेही संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात जे परिवर्तन झाले. त्याने देशालाही दिशा दिली. आता अनेक राज्य म्हणतं आहेत, की हमारे यहा भी हो सकता हे. महाराष्ट्राने डर को खतम कर दिया. आपण भीती मारली. जी दोन-चार लोकांची भीती होती ना इथे की, हे काहीही करु शकतात. ती भीती आपण संपवली. त्याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. आपल्या सर्वांना जाते.” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

“गेल्या ३६ दिवसात काय घडलं नाही. एक दिवस सकाळी ८ वाजता अजित पवारांनी शपथ घेतली. मी अंघोळ करुन बसलो होतो. त्यावेळी फोन आला आणि समोरुन विचारलं टीव्ही बघितला का? अजित पवारने शपथ घेतली. मी त्यांना सांगितलं जुना व्हिडीओ असेल. पण समोरचा व्यक्ती म्हणाला नाही लाईव्ह सुरु आहे. त्यांच्यासोबत कोण आहे. फडणवीस आहे. समोरुन विचारलं आता काय होणार, मी म्हणालो काहीही होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार.” असेही राऊत यावेळी म्हणाले.

आमच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षाकडे सुपूर्द : एकनाथ खडसे

“शपथ घेतली आहे. काहीही होणार नाही ते संध्याकाळपर्यंत परत येतील. हे काय होत माहित आहे का हा फक्त एक फाजील आत्मविश्वास होता. आपला नेता हा मुख्यमंत्री होणार आणि आपल्याला ते करायचं आहे. दुसरं म्हणजे शरद पवारांवरील माझा विश्वास होता. लोक काहीही म्हणू द्या माझ्या त्यांच्यावर पहिल्यापासून विश्वास आहे. त्यांनी एखादी गोष्ट करायची हे मनात आणलं. त्यांची कमिटमेंट असेल तर त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात.” असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

“साताऱ्यातील उदयनराजेंना घरी बसवायची कमिटमेंट होती. पवारांची ती सुद्धा त्यांनी भरपावसात केली. की या राजाला घरी बसवायचा. हा सर्व खेळ कमिटमेंटचा होता. ही लढाई माझी नाही. प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. आमदारांनाही तितकंच टेंशन आलं होतं. आमच काय होतं. अजून शपथ घेतली नाही. एक वेळ मलाही वाटलं आपल्यामुळे नुकसान होत नाही ना. पण नंतर मला वाटल नाही होणार.” असेही संजय राऊत म्हणाले.