शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य; प्रकाश आंबेडकर यांची खदखद

- संभाजीराजेंसोबत जायला तयार

Maharashtra Today

पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje)सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत आहे. या मोहिमेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी चालेल्या चर्चेत प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar)यांनी – मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही, अशी खदखद व्यक्त केली व मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, अशी ग्वाही दिली.

शरद पवारांची भूमिका ‘नरो वा कुंजरोवा’

याबाबत शरद पवार यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणालेत, “शरद पवार यांचं राजकारण मी ४० वर्षापासून जवळून पाहत आलो आहे. ते ‘नरो वा कुंजरोवा’च्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील.

या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणालेत, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो आहे. प्रकाश आंबेडकर यांनी – मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, अशी ग्वाही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button