मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

औरंगाबादः मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी खोटे आश्वासन देणारा नेता नाही. आम्ही खरे सांगतो आणि आश्वासन पूर्ण करतो. माझा वचननामा मी पूर्ण करणारच. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. औरंगाबाद येथील शिवसेनेचे उमेदवार अब्दूल सत्तार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

ही बातमी पण वाचा:- महाराष्ट्रात कोणाला मिळालं नसेल, एवढं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल ….

येत्या 21 तारखेला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. केंद्रिय नेतृत्त्वासह सर्व पक्षीय नेेते महाराष्ट्रात प्रचारात व्यग्र आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाचे नेतृत्त्वदक्ष नेते मैदानात उतरले आहे.

यावेळी ठाकरे यांनी बोलताना आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचं भांडण पाकिस्तानसोबत आहे. आपण इथं भांडत बसू नये तर एकत्र राहून पाकड्यांना नामोहरम करू, असं ठाकरे म्हणाले. विरोधकांना सध्या सभेला गर्दी जमत नाही म्हणून माणसं भाड्याने आणावे लागतात, पण आमच्या सभेत कुणी ‘भाडखाऊ’ नाही असं उद्धव म्हणाले.

आम्हाला लोकं विचारतात तुमच्यात अब्दुल सत्तार कसे? आज आमच्याकडे सत्तार आहेत उद्या सत्ता येईल, आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. समोर कुणीही असलं तरी अब्दुल भाई वाघ आहेत आणि ते जिंकणारच, असेही ते म्हणाले.