‘बोलघेवड्या नेत्यांना सांगतोय, केंद्राकडून सर्वांचेच मोफत लसीकरण’; फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra FadnaviDevendra Fadnavis-Sanjay Rauts-Sanjay Raut

मुंबई :- १ मेपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाच्या(Free Corona Vaccine) मुद्द्यावरुन आता राजकारण चांगलंच तापायला लागलं आहे. यादरम्यान अनेक राज्यं केंद्राकडे मदत मागत असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी उचलून धरत आहेत. करोना रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रातही मोठी समस्या असून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मदतीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा उल्लेख न करता अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच ११ व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे आणि कांगावाखोर नेते सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला (Maharashtra) दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. आजही हवाई दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये, अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही.र, ही भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. १०० टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. मत आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत.मात्र, एखाद्या राज्याला वाटले की त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खासगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात. आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. १ तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोड़ा गोधळ उडण्याची शक्यता आहे. गर्दी होणार नाही असे नियोजन राज्य सरकारने करायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना खडेबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button