राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहीजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे – संजय राऊत

Raj Thackeray & Sanjay Raut & Uddhav Thackeray.jpg

मुंबई :-  मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे फारकत घेऊन शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार केली. मात्र, त्यानंतरही राज यांनी शिवसेनेची साथ द्यावी किंवा शिवसेनेसोबत यावे. भाऊ भाऊ एकत्र यावे अशा प्रतिक्रिया नेहमीच उमटत राहील्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे प्रमुख नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खुद्द राज ठाकरे यांना पुन्हा साद घातल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सध्या ज्या संकटात सापडला आहे. महाराष्ट्राला या संकटातून काढण्यासाठी राज ठाकरे असतील किंवा ज्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दोन प्रमुख नेते कायम राज्याच्या हितासाठी लढत राहिलेत, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार (Sharad Pawar). शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावर उभे राहिले आहेत. राजकीय मतभेद असतील पण, महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर, सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नेते, जे मराठी जपण्याचं काम करतायेत, त्यांच्यामागे मराठी जनता उभी आहे. त्यांचा वापर करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे असं सांगत राऊत यांनी राज ठाकरेंबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER