पत्रकारितेत घोटाळा होऊ शकतो यानं धक्का बसला- संजय राऊत

Sanjay Raut.jpg

मुंबई : मुंबई (Mumbai) पोलिसांनी आज बनावट टीआरपी रॅकेट उघडकीस आणल्याने माध्यमविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना दोन मराठी वाहिन्या आणि रिपब्लिक टीव्हीकडून पैशांच्या मोबदल्यात बनावट टीआरपी खरेदी केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना ‘पत्रकारितेत घोटाळा होऊ शकतो यानं धक्का बसला’ असं म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, राफेल आणि बोफोर्सपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे.

जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा असून, मुंबई पोलिसांकडे त्याचे पुरावे आहेत. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याच मुंबई पोलिसांचं देशभरातून कौतुक होत आहे. विरोधकांनी हे समजून घ्यायला हवे. यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनाही चिमटा काढला. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसंदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही.

परंतु, माझ्याकडून अशा प्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधान केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी राऊत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER