मैं हूँ ना! राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना संदेश

Raj Thackeray - Avinash Jadhav

मुंबई :- मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव(Avinash Jadhav) यांना 2 वर्षांसाठी मुंबईतील पाच जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस आली आहे. तसेच, त्यांना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यातच आज त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

या भेटीत अविनाश जाधव यांच्याविषयी सखोल चर्चा झाल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंची भेट घेऊन निघताना बाळा नांदगावकरांना राज ठाकरेंनी एक निरोप अविनाश जाधव यांना द्यायला सांगितला, असंही बाळा नांदगांवकरांनी सांगितले.

राज ठाकरे आणि बाळा नांदगांवकर यांच्यात झालेल्या चर्चेत अविनाश मैं हूँ ना असा हा संदेश देण्यास राज ठाकरेंनी बाळा नांदगांवकरांना सांगितल्याचे खूद्द बाळा नांदगावकर यांनी परोस्ट करून सांगितले आहे.

बाळा नांदगावकर लिहीतात –

अविनाशला अटक झाली व तडीपार ची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने आज सकाळी लोकमान्य पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करून राज ठाकरेंकडे गेलो. तिथे अविनाश विषयी सखोल चर्चा झाली व राज ठाकरेंच्या निर्देशानुसार ठाणे गाठले. ठाणे (Thane) येथे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

राजकारणात विविध पक्ष असतात पण तुम्हाला माहीतच आहे आपला “मनसे परिवार” आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवार च ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लाऊन उभा असतो आणि आपले परिवार प्रमुख राज ठाकरे हे सर्व अक्षरशः सर्व कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करतात व जपतात. अविनाश बद्दल तर ही तळमळ अजून तीव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तेथून निघतांना बाकीच्या चर्चेबरोबरच राज ठाकरेंचा एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळेच आले.

ठाण्याला जाऊन अविनाश शी भेट झाली, व त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत व साहेबांचा विशेष संदेश सांगितला. काय ताकद असते ना केवळ तीन शब्द परंतु कार्यकर्त्यांत 100 हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा. जनतेसाठी आमचा लढा हा असाच अविरतपणे कायम राहील. अशी पोस्ट बाळा नांदगांवकरांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER