एकदा उभे करून द्यायचे, चालायला लागले की दूर व्हायचे, यापेक्षा जास्त सरकारशी संबंध नाही : पवार

Sharad pawar

मुंबई :- महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नसल्याचे सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, एकदा उभे करून द्यायचे, सगळे नीट चालायला लागले की मी लांब झालो. गरज पडली, मदत मागितली की मी आहे. यापेक्षा जास्त सरकारशी संबंध ठेवायचा नाही, असा मी निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल याबाबत मला कुठलीही शंका वाटत नसल्याचे पवार म्हणाले. आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे असल्यामुळे साहाजिकत मतभिन्नता आहेच. हे सरकार ज्यांच्या हातात आहेत. ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. मात्र समन्वय समिती मिळून एकत्र प्रश्न सोडवतो, असेही पवार म्हणाले. त्याचप्रमाणे जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले तरी त्यांचा राज्यावर विशेष परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले.

“लोका सांगे ब्रह्मज्ञान…”, भाजपाचा पवारांना टोला

काँग्रेसशी आमचा संबंध आहे मात्र शिवसेनेशी आमचा संबंध नव्हता. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझी मैत्री होती. त्यांच्याशी खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर ते करायचे. काँग्रेसचे निर्णय मात्र दिल्लीत होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. सहकार्य करायचे आणि सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसत असल्याचे पवार म्हणाले.

राज्यातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगताना पवार म्हणले महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे आहेत. तथापि, देशातील लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून असल्याचे सांगत पवार म्हणाले, शेतकऱ्यांवरील ओझे कमी करणे गरजेचे आहे. शेतीवर अवलंबून कुटुंब चालवणे आता कमी व्हाययाला हवे.

शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी काम आवश्यक असून रोजगाराची संधी वीज क्षेत्रात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही राज्य आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. साहित्य, संगीत, नाटक या गोष्टींचा राज्यात प्रसार वाढवा पाहिजे सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. मराठी भाषेवर बोलताना पवार म्हणाले, आपण मराठीचे अभिमानी आहोत पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिक आहोत. त्यामुळे भाषिक ऐक्य असले पाहिजे.

वाढत्या लोकसंख्येचा दबाव राज्यावर येत असून लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी नागरीकरणात अजून काम करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.


Web Title : I am not remote control of development : NCP Sharad Pawar

Maharashtra News : Latest Mumbai Marathi News only on Maharashtra Today