मी पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाही : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थिती ते पक्षाचा झेंडा हाती घेतील.

तत्पूर्वी खडसे यांनी आपल्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान पक्षप्रवेशाआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोणत्याही पदासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसल्याचं म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, “कोणत्याही पदासाठी नाथाभाऊ प्रवेश करत नाही. मी आपल्या ताकदीने उभा आहे. मी मंजूर केलेली उत्तर महाराष्ट्रातील अनेक विकासकामं प्रलंबित आहेत. या विकासकामांना वेग मिळावा यासाठी सरकारची साथ हवी आहे म्हणून सरकारमध्ये असले पाहिजे , असे खडसे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER