मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे

udhav thakre and ashok chavan

नांदेड :  राज्यात सध्या अनेक सिनिअर नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहे की काय असे दिसते. राष्ट्रवादीचे सिनिअर नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानानंतर आता त्याच शब्दाला मोड घालत मुख्यमंत्रिपदाची आपल्याला घाई नसल्याचे वक्तव्य कॉंग्रेसचे मोठे नेते ्शोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण –

अशोक चव्हाण भोकरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधी गोटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्यात फेरफार करुन त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीत खळबळ; नाना पटोलेंनी दिला स्वबळाचा नारा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER