मी भूमिका बदललेली नाही, उलट अनेकांनी भूमिका बदलून सत्ता स्थापन केली : राज ठाकरे

Raj Thackeray

औरंगाबाद :- मी भूमिका बदलली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेकांनी सत्ता स्थापन केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेने आपली भूमिका बदलली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मनसेने फक्त झेंडा बदलला आहे; आमची भूमिका तीच

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मनसेने उचलून धरली आहे.यापूर्वी ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. चांगले बदल झालेच पाहिजेत. असे म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज यांनी औरंगाबादमध्ये आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. मला हिंदू जननायक म्हणून नका असे आवाहन राज यांनी केले आहे. मनसेच्या पहिल्या राज्य अधिवेशात झेंड्याचा रंग बदलण्यात आला. त्यानंतर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला आहे. यानंतर राज यांच्याकडे हिंदू जननायक म्हणून पाहिले जात आहे. राज ठाकरे सध्या तीन दिवसीय मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे म्हणाले की, ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून देण्यात आलेली नाही. एका वृत्तवाहिनीने असे संबोधले होते. तुम्ही त्यांनाही विचारु शकता.