मी शिवसेनेचे निवडणूक धोरण आखत नाही : प्रशांत किशोर

prashant_kishor

पाटणा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्रात शिवसेनेसाठी निवडणूक धोरण आखत नसल्याचे जनता दल युनाइटेडचे उपाध्यक्ष आणि निवडणूक धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी घेतलेल्या मुंबईतील भेटीनंतर आले आहे.

किशोर म्हणाले, शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे. मी मुंबईत असताना शिवसेनेने मला भोजनासाठी बोलावले होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना भेटावयास गेले होते. मीसुद्धा जदयुचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणुक धोरण आखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रियंका गांधी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीही आहे. याबाबत ते म्हणाले, मी त्यांना हा सल्ला आधीच दिला होता. परंतु त्या दोन महिने निवडणूक असताना राजकारणात आल्या. त्यांच्या येण्याने काय फरक पडतो ते बघू. जदयुची भूमिका स्पष्ट करताना किशोर म्हणाले, पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावे याबाबत एनडीएमध्ये कुठलाही वाद नाही. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी आहेत आणि यानंतरही तेच राहतील. निश्चितपणे नितीशकुमार मोठे नेते आहेत यात दुमत नाही. मात्र त्यांची स्वत:ची भूमिका आहे. परंतु प्रत्येक नेता पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ शकत नसल्याचे किशोर म्हणाले.