नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही ; रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई : भाजप (BJP) खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन (Remdesivir) घेऊन आल्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे . या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले. ते अहदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करुन आणल्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील या प्रतिक्रिया दिली .

मी किती रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करुन आणली याचा उल्लेख केलेला नाही. मला यावर राजकारण करायचे नाही. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button