माझ्यावर पाळत ठेवली जाते; तृणमूल खासदाराचा आरोप

Mahua Moitra

दिल्ली : माझ्यावर पाळत ठेवली जाते. मी मागणी केली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी केला.

महुआ मोईत्रा यांनी याबाबत दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत लॉकडाऊन ते न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर तीव्र टीका केली. यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील कृष्णनगरच्या खासदार मोईत्रा यांनी लोकसभेत न्यायव्यवस्थे बाबत बोलताना माजी सरन्यायाधीशांच्या लैंगिक गैरवर्तन प्रकरणाचा उल्लेख केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. आज मोईत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त आणि बाराखंबा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना पत्र दिले. मोईत्रा यांनी त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा फोटो ट्विट केला आहे. घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पत्रात मोईत्रा यांनी दावा केला आहे की बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे ३ सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आले.

“या सशस्त्र जवानांच्या हालचालींवरन असे दिसते आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. मला असे जाणवते की मी पाळतीखाली आहे,” असे महुआ मोईत्रा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. देशाची नागरिक म्हणून ‘राइट टू प्रायव्हसी’ माझा मूलभूत हक्क आहे,” असे सांगत मोईत्रा यांनी सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER