खडसे भाजपा सोडणार नाहीत; आमचे जेष्ठ नेते आहेत – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Eknath Khadse

मुंबई : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी राजकीय चर्चा सुरू असताना, खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचा (BJP) राजीनामा दिल्याची नवी चर्चा सुरु झाली. याचे खंडन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने माझ्याकडे राजीनामा पाठवलेला नाही.

ते म्हणालेत – एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. ते असे काही करणार नाहीत. स्वतःचे नुकसान करून घेणार नाहीत. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. कोणीही पक्षाचा राजीनामा दिला तर तो माझ्याकडेच येईल. माझ्याकडे कुणाचाही राजीनामा आलेला नाही. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वतःही ट्विट करून म्हटले होते की, मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER