पवारांची औलाद आहो, गद्दारी केल्यास गाठ माझ्याशी आहे – अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या उघड शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांचं भाषण सुरू असताना मध्येच एक दारुडा बोलायला लागला. या दारुड्याला अजित पवारांनी आता माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलीस असतात, असं म्हणत मिस्कील  सल्ला दिला. तसेच कळ काढा आणि शिक्का कपबशीवरच मारा, असंही सांगितलं.

अजित पवार यांनी नीळकंठेश्वर पॅनलसाठी जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, “तुम्ही कामांसाठी थेट प्लॅन आणि इस्टिमेट काढून या. उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी नदीपात्र दुरुस्तीचं काम स्वतः जाऊन पाहतोय. कामासाठी निधी देईल; मात्र स्थानिक पातळीवर कामाला विरोध नको. कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यास तुम्ही कमी पडू नका. मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत सर्वांत जास्त विकास करणार आहे. ‘दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असा प्रकार खपवून घेणार नाही. करायचं असेल तर उघड करा. पण, का कुणी गंमत करायचा विचार करत असेल तर जंमतच करून टाकेन, आता कुणाचं ऐकणार नाही. राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला पदे दिली आहेत. त्यामुळे गद्दारी केल्यास लक्षात ठेवा, तर पवारांची औलाद सांगणार नाही. गाठ माझ्याशी आहे.” असेही ते म्हणाले.

अखेर महापोर्टल बंद; महाआघाडी सरकारचा मोठा निर्णय!

राजकारणात अनेक चढउतार असतात. मात्र, जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. आता आपल्या विचाराचं सरकार आहे. मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे. अर्थ संकल्प सादर करताना सामान्य माणूस केंद्रस्थानी असणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत बसणाऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. पुढच्या टप्प्यात दोन लाख रुपयांवरील कर्ज असणाऱ्यांपैकी सातत्याने कर्ज फेडणाऱ्यांची कर्जमाफी करणार आहे, असंही आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

अजित पवार यांनी आपण खोटं बोलत नाही, असं सांगत मालेगाव कारखान्याच्या कारभारावर सडकून टीका केली. या कारखान्याची रिकव्हरी कमी असल्याचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, “मालेगाव कारखान्याच्या घाण पाण्यानं नदीचं पाणी प्रदूषित होतंय. मी तक्रार केली तर कारखाना बंद होईल. त्यामुळं माझ्या विचाराचं पॅनल कारखान्यात आलं पाहिजे. आपण उच्च तंत्रज्ञान वापरून सुधारणा करू. नदीपात्रातील घाण कायमची काढून टाकू. असं नाही झालं तर पुढच्या निवडणुकीत मला येऊ देऊ नका. या निवडणुकीत शरद पवार, सुप्रिया आणि माझ्याकडे पाहून मतदान करा.”

अजित पवार यांनी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांनाही गद्दारी केल्यास याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिला. अजित पवार म्हणाले, “मालेगाव कारखान्याचा अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. माळेगाव कारखाना चालवणार्‍या भाजपने बारामती, इंदापूरचे नीरा देवघर धरणातून मिळणारे पाणी बंद केले होते. नीरा डावा कालव्याच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती.  तुम्ही शेतकरी असला तर कारखाना ताब्यात द्या, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील. मी मंत्रिमंडळात असून तुमचा सहावा गट निर्माण करणार आहे. बारा जागा भरायच्या असून तो निर्णय घेणार आहे. त्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान करा. मला मतदान बूथनुसार केलेलं मतदान कळणार आहे. ३० वर्षे ऐकलंय. मी कुणालाही माफ करणार नाही. फोनचे रेकॉर्ड काढून चौकशी करणार आहे. माझा एनसीपी म्हणून मिरवणाऱ्यांनी गद्दारी केली तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे.” असेही पवार म्हणाले.