मी भरपूर खाज असलेला खासदार आहे – उदयनराजे

Udayan Raje Bhosale

सातारा :- कायद्यात असे कुठे म्हटले आहे का, मंत्री असेल तरच उद्घाटन करायचे. मीसुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार आहे, असे शहरातील ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटन संदर्भात उदयनराजे म्हणालेत. लोकांचा कौल घेतला आणि शटर उघडले, असे त्यांनी सांगितले.

साताऱ्यात काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. आज पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी त्यावरून चौफेर तोफ डागली.

बाकीचे रथी-महारथी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला आले असते तर भाषणे  झाली असती आणि न पाहताच सांगितले असते योगदान किती ते ! मी ‘अभी के अभीच’ म्हणत उद्घाटन केले आहे, आता कोणीही काही करू द्या, उद्घाटन झाले आहे. जसे ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले तसे वेळ आली तर मेडिकल कॉलेजचे पण उद्घाटन करणार, कोणी आडवं आलं तर आडवं करणार, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी श्रेयवादामुळे मेडिकल कॉलेज रखडले. फडणवीस सरकारच्या काळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आणि चालना मिळाली. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावले होते; पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते. ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी सर्व लोकप्रतिनिधींना, शरद पवारांना विनंती करूनसुद्धा संकुचित विचार किंवा नाकर्तेपणामुळे कोणीही आले नाही, असा आरोप उदयनराजेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER