राज्यपालांचे सचिव न्यायालयाला काय उत्तर देतात याची मलाही उत्सुकता : गुलाबराव पाटील

Governor Bhagat Singh Koshyari - Gulabrao Patil

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते तथा सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शनिवारी दुपारी जळगावात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली आहे. त्याचे उत्तर दोन आठवड्यांत मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता असल्याचे पाटील म्हणाले.

राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या १२ लोकांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. याबाबत राज्यपालांनी निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. नियुक्तीचा अधिकार त्यांना आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे.

आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधान परिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात विकासाच्या बाबतीतच नव्हे तर राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशात विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button