मी आहे राज्यसेवक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari

नाशिक : मी राज्यपाल नाही, राज्यसेवक आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणालेत. ते नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमात बोलत होते.

अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. शासनात काम करणाऱ्यांना देखील अशी दैवी दृष्टी मिळावी,” असा टोमणा कोश्यारी यांनी मारला.

भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच गुलाबी गाव भिंतघर येथे आले होते. त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचे वाटप करण्यात आले. १११३७ लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ उपस्थित होते. झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पाणी अडवण्यासाठी मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असे झिरवळ म्हणालेत.

धावपटू कविता राऊतला नोकरी नाही

झिरवळ यांच्या मागणीचा धागा पकडून राज्यपालांनी राज्य सरकारला टोमणे मारलेत. झिरवळ सरकारमध्ये आहेत पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करते? धावपटू कविता राऊतला नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री केवळ नोकरी देण्याच्या गोष्टी करतात. करत काहीच नाही. मग सरकार नेमके काय करते, असा प्रश्न राज्यपालांनी केला.

शहरे झपाट्याने वाढली. त्यांचा विकासही झाला. मात्र आदिवासी कायम दुर्लक्षित राहिला आहे. गरजा कमी असल्या तरी अडचणी असतात. तरीही आदिवासी कायम आनंदी राहिला आहे. आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात यायला हवे, असे आवाहन त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER