मी शिवसैनिक, मला माहिती आहे, उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

Naryane rane & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवरून राजकारण तापलेलं आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मोठा आरोप केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता.

मी शिवसैनिक आहे. त्यामुळे मला माहीत आहे.’ अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. जी पावलं आता टाकत आहेत. बैठकीवर बैठका घेत आहेत. सर्व पक्षांना एकत्रित करून आरक्षणावर बोलले जात आहे तेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी का नाही केले? तेव्हा का नाही कोणत्या बैठका घेतल्या? असा सवालदेखील नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

खरं तर, मराठा आरक्षणावर स्थगिती आणताच पोलीस भरती काढल्यामुळे राजकीय वर्तुळात मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर शंका उपस्थित केली जात आहे. एवढेच नाही तर याच मुद्द्याला घेऊन नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्यात इतिहासातली सर्वांत मोठी मेगा भरती आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करत आहे, असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER