भाजपात प्रवेश करणार का? तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केली भूमिका

nusrat-jahan

नवी दिल्ली : पश्चिम बंगालसहित पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (nusrat-jahan) यांचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या यश दासगुप्ता (Yash-dasgupta) यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थिती पक्षात प्रवेश केला आहे. यश दासगुप्तांच्या भाजपात जाण्याने टीएमसीमध्ये (TMC) खळबळ उडाली आहे.

दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यामुळे नुसरत जहाँ ह्यादेखील भाजपामध्ये प्रवेश करणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र आता या सर्व चर्चा नुसरत यांनी फेटाळून लावल्या आहेत. माझी तृणमूलशी बांधिलकी आहे. मी तृणमूलची प्रामाणिक सैनिक आहे, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे. यश दासगुप्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नुसरत जहाँ यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी टीएमसीची प्रामाणिक सैनिक आहे आणि आपल्या पक्षासाठी नेहमीच काम करत राहणार आहे, असे नुसरत यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER