माझ्या नावावर कोणी बिल्डिंग बांधावी ही माझीपण इच्छा, पवारांचा कंगनाला टोला

Sharad Pawar - Kangana Ranaut

मुंबई : खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे (Sharad Pawar) बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं पत्राचं ट्वीट केलं असून या फ्लॅटच्या खरेदी व्यवहारात शरद पवारांचा संबंध जोडला आहे. यावरून पवारांकडून कंगनाची खिल्ली उडवण्यात आली.

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. माझी पण इच्छा आहे… माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे.’, असे पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेतली. त्यात सविस्तर चर्चा झाली. आज मराठा समाजांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री बोलणार बोलावली आहे. राज्य सरकार लवकरच यावर तोडगा काढेल, असा दावा पवारांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER