राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याशी मी सहमत : संजय राऊत

sanjay raut and raj thackeray

मुंबई : मुंबईसह राज्यातील अन्य महानगरपालिकांच्या (Mahanagarpalika) निवडणुकीत मनसे (MNS) पूर्ण ताकदीने उतरणार असून, कोणाबरोबर युती करायची वा नाही याचा निर्णय वेळ येईल तेव्हा घेऊ, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितले . मात्र दुसरीकडे राज्य कोरोनाशी दोन हात करत आहे. समाज अस्थिर असताना निवडणुका घेणे कितपत योग्य याचाही विचार झाला पाहिजे, असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सहमती दर्शवली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले . कोरोनाचा बहाणा करून निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा व काही प्रभाग फोडण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी घाई करू नये, असे म्हटले आहे. माझेही तेच म्हणणे आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे.

अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे? जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता? असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button