शरद पवार यांचे नेतृत्व मी स्वीकारले : एकनाथ खडसे

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई :- मी संकट मोचक नाही. मी अडचणीतून मार्ग काढणारा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेतृत्व मी स्वीकाले आहे. आता खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे,असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला . तसेच पवारांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केले .

मी पक्ष सोडत असताना मला दिल्लीवरुन फोन आला होता. त्यावेळी त्यांनी तुम्ही पक्ष का सोडता अशी विचारणा केली होती, असा खुलासाही खडसे यांनी केला. मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे .

मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी विचारण्यात आलं होतं. तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी तुम्ही मला देऊही शकणार नाही. कारण मी आतापर्यंत इतकं काही घेतलं आहे. जवळपास 15 ते 16 मंत्रिपदाचे खाते, विरोधी पक्षनेताही राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात काहीही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पण मला काही उरलेली विकासकामे पूर्ण करायचे आहेत, असेही खडसेंनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना आरक्षण देता आले असते, त्यांनी दुर्लक्ष केले; मराठा महासंघाचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER