मोदींच्या अश्रूंची टिंगल उडवण्यावर कंगना राणौतची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली…

PM Modi-Kangana Ranaut

मुंबई :- २१ मे रोजी मोदींनी वाराणसीतील डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावुक झाले अन अख्ख्या देशाने पाहिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना मोदींना गहिवरून आले. यावरून त्यांच्यावर विरोधकांचे टीकास्त्र सोडणे सुरू झाले. ‘बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला कार्यक्रम होता.’ अशी टीका विरोधकांनी केली. सोशल मीडियावरही (Social Media) त्यांच्या या भावुकतेची टिंगल उडवली. यावर आता कंगना राणौतनी प्रतिक्रिया दिली.

या संदर्भात कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) एक लांबलचक शेअर पोस्ट केली आहे. “अश्रू खरे होते वा खोटे… तुम्ही टिअर डिटेक्टर टेस्टमध्ये गुंतून राहणार आहात की दुसऱ्यांचे दु:ख बघून तळमळणाऱ्या व्यक्तिच्या भावना स्वीकारणार आहात. वेदना असहनीय होतात, तेव्हा त्या व्यक्त कराव्याच लागतात. हे दु:ख वाटावेच लागते. मी तुमचे अश्रू स्वीकातेय… पंतप्रधान मोदीजी मी तुम्हाला तुमचे दु:ख शेअर करू देईऩ… प्रिय, भारतीयांनो प्रत्येक आशीर्वाद समस्या समजू नका. स्वत:चे अ‍ॅटिट्यूट आणि विचार स्वत: ठरवा.”

२१ मे रोजी मोदींनी वाराणसीतील डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे जीव गमवावा लागणाऱ्यांवर मोदींना अश्रू अनावर झाले. यापूर्वी यूपीमध्ये मेंदू ज्वरामुळे हजारो चिमुकल्यांनी जीव गमवला, त्यावरसुद्धा मोदींना संसदेत रडू कोसळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button