IPL 2020: हैदराबाद संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम आहे, बंगळुरूला पाच गड्यांनी दिली मात

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore

शारजाह येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतीउत्तरात हैदराबादच्या संघाने १४.१ षटकांत ५ गडी गमावून १२१ धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. बंगळुरूने निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १२० धावा केल्या. बंगळुरूकडून जोश फिलिपने ३२, एबी डिव्हिलियर्सने २४, वॉशिंग्टन सुंदरने २१ आणि गुरकीतसिंग मानने (नाबाद१५) धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने प्रत्येकी दोन, टी नटराजन, शाहबाज नदीम आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

बंगळुरूने १३ सामन्यांपैकी सात सामने जिंकण्यात यश मिळविले आहे आणि सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर हैदराबादने त्यांच्या १३ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि सात गमावले आहेत. अशाप्रकारे, बंगळुरू १४ गुणांसह गुणांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर हैदराबाद १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER