डॉ. प्रियंका रेड्डी प्रकरण ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Dr-Priyanka-Reddy-696x405 (1)

हैद्राबादः निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास तेलंगणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हैदराबाद शहराच्या बाहेरील शमशादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला. ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती.

डॉ. रेड्डी यांच्यावर सामुहीक बलात्कार केल्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.