हैदराबादने दिल्लीला १५ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेतील प्रथम विजय नोंदविला

Delhi Capitals vs Sunrisers

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा ११ वा सामना अबू धाबी येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबाद संघाने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १६२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकांत ७ गडी गमावून १४७ धावा करू शकला. हैदराबादने १५ धावांनी सामना जिंकून स्पर्धेत आपले खाते उघडले.

दिल्लीची टॉप ऑर्डर नाही चालली, शॉ आणि अय्यर अपयशी ठरले
हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद केले. अवघ्या २ धावांवर तो जॉनी बेयरस्टोचा हाती झेलबाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने २१ चेंडूत १७ धावा फटकावल्या आणि श्रेयस अय्यरला सामदने झेलबाद केले. शिखर धवनने ३४ धावा फटकावल्या आणि राशिद खानने त्याला बेयरस्टोचा हाती झेलबाद केले.

शिमरोन हेटमायरच्या रूपात संघाला चौथा धक्का बसला. हेटमायरने १२ चेंडूत २१ धावा केल्या आणि भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. पाचवा धक्का रुषभ पंतच्या रुपात आला, त्याने २७ चेंडूत २८ धावा केल्या आणि राशिद खानचा बळी ठरला. या संघाला मार्कस स्टोइनिसच्या रूपात सहावा धक्का बसला. टी नटराजनने त्याला ११ धावांच्या मोबदल्यात एलबीडब्ल्यू करून परत पाठवले. अखेरच्या षटकात अक्षर पटेलला खलील अहमदने ५ धावांवर बोल्ड केले आणि सामना पूर्णपणे हैदराबादने आपल्या खिशात घातला.

हैदराबादचा डाव, मिळाली माफक सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोने सनरायझर्स हैदराबाद संघाला सलामी दिली. दोघांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांत बळी न गमावता ३८ धावा केल्या. वॉर्नर आणि बेअरस्टोने ९.३ षटकांत संघासाठी ७७ धावा जोडल्या पण वॉर्नरने ३३ चेंडूत ४५ धावा केल्यावर अमित मिश्राच्या चेंडूवर झेलबाद झाला. मिश्राने पुढच्याच षटकात मनीष पांडेला ३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले.

हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने ४४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह अर्धशतक झळकावले. मात्र, ५३ च्या वैयक्तिक स्कोअरवर तो रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला. केन विल्यमसन २६ चेंडूंत ४१ धावांवर बाद झाला. अब्दुल समद ११ धावांवर तर अभिषेक शर्मा १ धाव काढून नाबाद होता. दिल्लीकडून कगिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

शिमरोन हेटमायरने १२ चेंडूत २१ धावा केल्या आणि भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर मनीष पांडेच्या हाती झेलबाद झाला.

दोन्ही संघात बदल झाले
या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने एक बदल केला, तर सनरायझर्स हैदराबादने संघात दोन बदल केले. दिल्लीने इशांत शर्माला संघात स्थान दिले तर आवेश खानला वगळण्यात आले. त्याचवेळी हैदराबादने १८ वर्षीय अब्दुल समद तसेच केन विल्यमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. हैदराबादने मोहम्मद नबी आणि रिद्धिमान साहाला वगळले.

दिल्ली कैपिटल्सचे प्लेइंग इलेव्हन
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिमरोन हेटमायर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबादा, एनरिच नॉर्त्जे आणि इशांत शर्मा.

सनराइजर्स हैदराबादचे प्लेइंग इलेव्हन
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER