पती-पत्नी दोघेही सरसावलेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

Jayant Patil

सांगली : कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या बऱ्याचशा भागांत महापुराच्या पाण्यानं थैमान घातलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला. हजारो घरे वाहून गेलीत. लाखो लोकांना पुराच्या पाण्यातून वाचवण्याचे काम एनडीआरएफ करत आहेत.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील हेदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. तर त्यांच्या पत्नी शैलजा पाटील चार दिवसांपासून पूरग्रस्तांना स्वतः जेवण तयार करून जेवणाची पाकिटे पोहचवण्याचे काम करत आहेत. पूरग्रस्त गावातील जवळपास पाच हजार लोकांना रोज त्या पाकिटे स्वयंसेवकांमार्फत पोहचवत आहेत. चार दिवसांपासून शैलजा पाटील यांचा हा रोजचा दिनक्रम बनला आहे.