”या” गोष्टींमुळे पती घेतात आपल्या पत्नीवर संशय ..!!

Doubt - संशय

पती-पत्नीचे नाते सर्वस्वी विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असते. एकमेकांवरचा विश्‍वास हा पती-पत्नीच्या नात्याचा, सहजीवनाचा पाया असतो. हा पायाच ढासळला तर नाते तुटू शकते किंवा नात्यात समस्या उद्भवू लागतात. काही अगदी साध्या गोष्टी असतात. पण त्यामुळे नाते बिघडू शकते किंवा संशयला जागा निर्माण होते. जाणून घेऊया त्याबद्दल…

  • जर पत्नी पतीसोबत कमी बोलत असेल आणि इतरांशी मनमोकळ्या गप्पा मारत असेलतर पुरुषांच्या मनात शंका डोकावू लागते. तसंच पुरुषांच्या मनात काही असेल तर ते पटकन व्यक्त करत नाही आणि गोष्टी मनातल्या मनात ठेवल्याने शंका वाढू लागते. अशी काही शंका वाटत असल्यास बोलून तिचा निचरा करा. गोष्टी मनात ठेवल्याने नाते दुषित होऊ शकते.

संशय

  • वेळ मिळताच जर पत्नी हातात मोबाईल घेत असेल आणि त्यातच वेळ घालवत असेल तर पतीच्या मनात संशयची पाल चुकचुकते. मग ती फोन चेक करत असो किंवा त्यावर गेम्स खेळत असो, पुरुषांच्या मनात विविध विचारांचे काहूर माजते.

  • प्रत्येक महिलेला नटायला फार आवडते. पण काही महिलांची ही सवय पुरुषांना खटकते आणि त्यांच्या मनात संशय घर करु लागते.

संशय

  • पत्नी जर इतर पुरुषांची मनमोकळ्या गप्पा मारत असेल तर पतीच्या मनात शंका उत्पन्न होते. खरंतर ते त्याला सहन होत नाही. मनातल्या मनात भीती, शंका सतावत राहते.

  • पतीच्या अनुपस्थितीत पत्नी फ्रेंड्सना भेटायचा सारखा सारखा प्लॅन करत असेल तर पतीच्या मनात संशय येऊ लागते. मला सांगूनही ती जावू शकत होती, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो.