नवऱ्याची ‘ही’ गोष्ट आवडत नाही; शोएब मलिकवर सानिया मिर्झाचा मोठा खुलासा

Sania Mirza - Shoaib Malik

नुकताच भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या क्रीडा पत्रकाराशी झालेल्या संभाषणादरम्यान तिचा नवरा शोएब मलिकच्या या कृत्याचा खुलासा केला, ज्याचा तिला सर्वाधिक तिरस्कार आहे.

शोएब मलिकच्या उणिवा उघडकीस आणत सानिया म्हणाली की, जेव्हा शोएब आणि तिच्यात भांडण होते तेव्हा शोएब पूर्णपणे शांत असतो आणि कोणताही प्रतिसाद देत नाही. शोएब आपल्या मनातलं बोलत नाही किंवा त्याच वेळी भांडण संपवण्याचा प्रयत्न करीत नाही आणि सानियाला शोएबच्या या सवयीचा सर्वाधिक तिरस्कार आहे.

सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने २०१० साली लग्न केले आणि त्यांच्या लग्नाने बरेच मथळे बनवले होते; कारण एकीकडे सानिया ही भारताची सर्वांत यशस्वी टेनिसपटू होती तर दुसरीकडे मलिक पाकिस्तान क्रिकेट संघाचा मध्यमक्रम फंलंदाज होता. लग्नाला १० वर्षे झाली तरी या दोघांमधील प्रेम अजिबात कमी झाले नाही आणि दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. यांना एक मुलगा असून शोएब आणि सानियाने त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले आहे.

सानिया पाकिस्तानी क्रीडातज्ज्ञ जैनब अब्बास यांच्याशी शोएबशी झालेला विवाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या संबंधांविषयी उघडपणे बोलली. ती म्हणाली, ‘आमचे भांडण झाल्यास शोएब काहीही बोलत नाही आणि त्याला फक्त गप्प बसायला आवडते. त्यावेळी माझे काहीतरी फोडण्याचे मन करते; कारण मला असे वाटते की काहीतरी बोलले पाहिजे जेणेकरून गोष्टी पूर्ण होऊ शकतात; अन्यथा ते खूप पुढे जाईल.’ सहा वेळा ग्रँड स्लॅम विजेती सानिया पुढे म्हणाली, ‘मीच अशी व्यक्ती आहे जिला बोलून लढा संपवायचा असते. त्याच वेळी, शोएब हा एक असा आहे, जो आरामात बोलण्यावर विश्वास ठेवतो. मी बोलत असते तेव्हा तो त्याचा फोनमध्ये बघत असतो. मला याचा फारच तिरस्कार आहे. मला ते सहन करता येत नाही.’ सानियाला जेव्हा विचारले गेले की, शोएबला तुझी कोणती सवय आवडत नाही? तेव्हा सानियाने उत्तर दिले की, मी खूपच कमी धैर्यवान आहे आणि माझी ही सवय शोएबला अजिबात आवडत नाही. ती म्हणाली, ‘मला वाटते मी धीर धरत नाही. शोएबला माझी ही गोष्ट सर्वाधिक नापसंत असेल.’


Web Title : Sania Mirza’s big revelation on Shoaib Malik

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER