चक्रीवादळग्रस्तांना वाढीवदराने नुकसान भरपाई मिळणार; ठाकरे सरकारचा निर्णय

CM Uddhav Thackeray - Cyclone Victims

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार ७२ कोटी रुपयांचा एकूण नुकसानीचा आकडा आला होता. यात राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीतून १८० कोटी रुपयांचे अधिकचे घालून मदत जाहीर केली आहे. लवकरच या मदतीचे वाटप सुरू करण्यात येईल.

गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळ आल्यावर कोणतीही मागणी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हजारो कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. पंतप्रधानांनी राज्याचा दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. पंतप्रधानांनी कोकणातही येऊन, भेट देऊन मदत जाहीर करावी, अशी आमची विनंती आहे, असे पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button