‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक तीव्र, मुंबईसह उपनगरात सतर्कतेचा इशारा

Maharashtra Today

मुंबई : अरबी समुद्रात(Arabian Sea) तयार झालेलं तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक तीव्र होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ‘तौत्के’ (Tautke)चक्रीवादळाचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक ठिकाणी याचा मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते. तसेच अनेक ठिकाणी विजेचा पुरवठाही खंडित झाला आहे.

सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर सक्रिय आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. वरळी सीफेस रोडवर मोठं झाड पडल्यानं एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वरळी सीफेस कडून हाजीअलीच्या दिशेनं जाणरी वाहतूक वळवण्यात आली आहे.

येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मुंबई शहर ११, पश्चिम उपनगर १७, पूर्व उपनगरात ६ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तौत्के चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळाले. ८० ते ९० किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील विज खंडीत झाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button