तौक्ते चक्रीवादळ : ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? निलेश राणेंची आगपाखड

Nilesh Rane - Aaditya Thackeray

मुंबई : तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकले नसले तरी त्याचा फटका मुंबईच्या किनारी भागांना चांगलाच बसला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारी भागांमध्ये वादळी पाऊस आणि वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडीओ शेअर करून थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असल्याचे दृश्य दिसत आहे. चिंचोळ्या गल्लीमध्ये प्रचंड पाणी साचल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या वर्षी पावसाळा नसताना ऐन उन्हाळ्यात चक्रीवादळामुळे पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मुंबई पॅटर्नची पतंग कुठंय?

वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून निवडून ते विधानसभेवर गेले आहेत. “हे चित्र वरळी मतदारसंघाचे आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसले, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.” अशा संतप्त शब्दांत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button