‘तौक्ते’ चक्रीवादळ : फडणवीस करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी; दोन दिवस कोकण दौरा

Devendra Fadnavis on Konkan Daura - Maharashtra Today

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. कोकण किनारपट्टीवरच्या शेतकऱ्यांचे आणि गावातील घरांचेही नुकसान खूप झाले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दोन दिवस या भागाचा दौरा करणार आहेत.

या वादळामुळे रायगडसह, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. या भागातल्या जिल्ह्यांमध्ये झाडांची पडझड, घरांचे नुकसान झाले. बुधवार आणि गुरुवारी देवेंद्र फडणवीस दौरा करणार असून बुधवारी रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची तर गुरुवारी रत्नागिरीमध्ये पाहणी करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हवाई पाहणी करण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांची नुकसान भरपाई राज्य सरकारने त्वरित करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली. यापूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळीही देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही पाहणी केली. यावेळी केलेली मदत नागरिकांना अपुरी पडली होती आणि तीही वेळेत मिळाली नव्हती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले – गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठीशी उभे राहायला हवे, गेल्या चक्रीवादळात वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. यावेळी कमी नुकसान झाले असावे अशी आपेक्षा आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button