‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकलं, वाऱ्यामुळे घरांचे छपरं उडाली

Nisarg Cyclone

रायगड : महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास अलिबाग समुद्रकिनारी चक्रीवादळ धडकलं आहे. येत्या दोन तासात वॉल क्लाऊड्स मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सरकत आहेत. पुढच्या दोन तासात मोठा पाऊस आणि वाऱ्याचा वेग असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अलिबागला धडक देताच या चक्रीवादळाने आपलं रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग येथील काही घरांचे छपरं उडाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १२५ किमी असल्याचा अंदाज वर्तवला जात असून, येत्या दोन तासात हे वादळ मुंबईत दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER