
पुणे : दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे काही ठिकाणी झालेला भुरभुर पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी राज्यातील बहुतांश भागात हुडहुडी भरली. शनिवारची पहाट उजाडली ती भुरभुरणाऱ्या पावसासोबतच. सकाळी सातनंतर पाऊस थांबला तरी दिवसभर ढगाळ वातावरण आणि अंगात हुडहुडी भरवणाऱ्या गार वाऱ्यामुळे अवघे जनजीवनच गारठून गेले. शुक्रवारपर्यंत कमाल तापमानाचा २६ ते 32 अंशावर होते. मात्र पारा शनिवारी सरासरी १८ अंशांपर्यंत खाली आला.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम ताज्यभर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शुक्रवारी रात्रीपासूनच राज्याच्या अनेक ठिकाणी वारे सुटल्याने वादळाची चाहूल लागली. मध्यरात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि भुरभुर पाऊस सुरू झाला. सकाळीपर्यंत तो सुरूच राहिला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोकण आदी भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पारा 12 अंशावर आला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला