‘अम्फान’ वादळाचे पश्चिम बंगालमध्ये ८५ बळी

AMphan

कोलकाता : अम्फान वादळाच्या तडाख्यात पश्चिम बंगालमध्ये ८५ लोकांचा जीव गेला आहे. विद्युत व पाणी पुरवठा बंद झाल्याने लोकांनी कोलकात्यात प्रशासनाविरोधात निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यास भेट देऊन पाहणी करणार आहेत. या जिल्ह्यात वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरे व झाडे कोसळली आहेत. १.५ कोटी लोकांना वादळाचा फटका बसला असून १० लाख घरे पडली आहेत. वीज व मोबाईल सेवा काही प्रमाणात सुरळीत झाली असली, तरी कोलकाता, उत्तर व दक्षिण २४ परगणा भागात अजून काही ठिकाणी अंधारच आहे. मदतकार्य सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER