अम्फान चक्रीवादळ; पश्चिम बंगालला १ हजार कोटींची तात्काळ मदत – मोदी

PM Modi

बशीरहाट : ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ हजार कोटी रूपयांची तात्काळ मदत देण्याची घोषणा केली. या चक्रीवादळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रूपयांच्या मदत देण्यात येणार आहेत.

देशात करोनाचे संकट असतानाच पश्चिम बंगाल आणि ओडिशावर अम्फान चक्रीवादळाचे संकट कोसळले होते. मोदी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करणार आहेत. लॉकडाऊनच्या ८३ दिवसानंतर मोदी यांचा हा पहिला दौरा आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदीं ८३ दिवसांनंतर दिल्ली बाहेर; अम्फन वादळाच्या पार्शवभूमीवर ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा 

केंद्र सरकारची एक टीम पश्चिम बंगलच्या दौऱ्यावर जाईल व नुकसानीची पाहणी करेल आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत करेल, असे मोदी म्हणालेत. दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील मोदींसोबत होत्या. दोघांनी हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मोदी ओडिशाचा दौराही करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता प्रवेश केला. अनेक झाडे, घरे उन्मळून पडली. विजेचे खांबही कोसळले होते. बंगाल व ओडिशा या दोन राज्यात ६ लाख ५८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाल्याची नोंद करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला