कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला सोडलेला घोडा मेला; अंत्यसंस्काराला झाली गर्दी

horse funeral

बेळगाव :- कोरोनाला (Corona Virus) हद्दपार करण्यासाठी बेळगावात देवाला सोडलेला घोडा मेळा. घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी (Horse Funeral) हजारो लोकांनी गर्दी केली. यामुळे प्रशासन त्रस्त झाले आहे. घोड्याच्या अंत्यसंस्कारात गेलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली होणार आहे. (Hundreds of People gather at the funeral of Horse in the Maradimath area of Belagavi)

मरडीमठ येथे देवाला घोडा सोडला

कर्नाटकमध्ये गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा घोडा बुधवारी मध्यरात्री १२ ते गुरुवारी सकाळी ४ वाजेपर्यंत सोडला होता. तो शनिवारी रात्री मेला. घोडा देवाला सोडलेला होता म्हणून त्याच्या दर्शनासाठी गर्दी झाली. मरडीमठ आणि कोन्नूर ग्रामस्थांनी मिळून या घोड्यावर अंत्यसंस्कार केले. या गर्दीत सुमारे ५०० लोक जमले होते.गाव सील, उपस्थितांची होणार रॅपिड अँटीजेन चाचणी

बेळगावचे एसपी लक्ष्मण निंबरगी आणि तहसीलदारांनी कोन्नूर गाव आणि मरडीमठ १४ दिवस सील कला आहे. घोडाच्या अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची म्हणजे, या परिसरातील जवळपास चारशे घरांची तपासणी होणार आहे. लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button