शिवसेनेला धक्का, लवकरच शेकडोंच्या संख्येत गुजराती बांधव मनसेचा झेंडा हाती घेणार

Raj Thackeray Maharastra Today

मुंबई :- आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. सत्ताधारी शिवसेनेसह इतर पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून, यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. तीन-चार दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. या सदस्य मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मुंबईतील गुजराती बांधवही मनसेकडे आकर्षित होत आहे. लवकरच शेकडोंच्या संख्येने गुजराती बांधव मनसेत प्रवेश करणार आहे. आणि शिवसेनेला मोठा धक्का असणार आहे.

मुंबईतल्या एका उपनगरात गुरूवारी शिवसेनेच्या तब्बल ३५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आपल्या हाती घेत प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल अमित ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी मनसेत मोठे इन्कमिंगचे संकेत दिले. केवळ भांडुपचा नाही तर विक्रोळी आणि मुलुंड परिसरातले विविध पक्षाचे पदाधिकारी येत्या काळात मनसेत प्रवेश करतील. येणाऱ्या काही दिवसात मोठ्या संख्येने गुजराती बांधव, विक्रोळी परिसरातील मराठी बांधव मनसेत प्रवेश करताना दिसतील. या भागात शिवसेनेला खिंडार पडेल, असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने सदस्य नोंदणीसाठी ठिकठिकाणी बॅनर लावले आहे. विशेष म्हणजे गुजराती बहुल भागात मनसेने गुजराती भाषेतच गुजराती बांधवाना मनसेत येण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपाला धक्का ; साताऱ्यातील  भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER