पेणमध्ये भाजपच्या आजी माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

NCP & BJP

रायगड :- पेण शहरांमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. आज राष्ट्रवादीचे (NCP) खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली ६ विद्यमान नगरसेवक व ५ माजी नगरसेवकांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षांमध्ये प्रवेश केला.

पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे, वसुधा पाटील, राजेंद्र वाडकर, मंगेश पेडामकर, अर्पिता कुंभार, भावना बांधणकर, प्रतिभा जाधव या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक हबीब खोत, कृष्णा भोईर, बाळकृष्ण नाईक, तुकाराम पाटील व पांडुरंग जाधव, वाहीद खोत, रफिक झटाम, विशाल बाफना, तजीम मुकादम, भूषण कडू , किरण शहा, प्रसन्न पोटे, निकित पाटील, संजय कांबळेे, सुरेश म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी सुनील तटकरे यांनी प्रवेश केलेल्या सर्व आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप नेत्याचे स्पष्टीकरण  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER