मनुष्य १५० वर्षांपर्यंत जगू शकतात, संशोधकांचा दावा

Humans can live up to 150 years - Maharashtra Today

नवी दिल्ली :- सिंगापूरस्थित बायोटेक कंपनी जीरोच्या वैज्ञानिकांनी जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी खासप्रकारचे इंडिकेटर्स तयार केले. या इंडिकेटर्सला डायनेमिक ऑर्गेनिज्म स्टेट इंडिकेटर म्हणतात. याने हे समजतं की, मनुष्याचं शरीर जास्तीत जास्त किती वयापर्यंत त्याची साथ देऊ शकतं. यासाठी खासप्रकारे रक्ताची टेस्ट करावी लागते. या वैज्ञानिकांनी रक्ताची टेस्ट केल्यावर त्यांनी तयार केलेल्या इंडिकेटर्ससोबत ते मॅच करून पाहिले. ज्यातून समोर आलं की जर आरोग्य चांगलं राहिलं आणि परिस्थिती मनुष्याच्या शरीराच्या अनुकूल राहिली तर तो व्यक्ती १५० वर्षापर्यंत जिवंत राहू शकते.

वैज्ञानिकांनी वयासंबंधी व्हेरिएबल्स आणि वय घटण्याच्या ट्रॅजेक्टरीला सिंगल मेट्रिकमध्ये टाकलं. याने संभावित जास्तीत जास्त वय समोर येतं. वय वाढण्याला बायोलॉजीच्या भाषेत अशा स्थितीला म्हटलं जातं जेव्हा शरीरातील अवयव काम करतात आणि शरीर आजारांनी संक्रमित होत राहतं. मग तो कॅन्सर असो, मानसिक आजार असो किंवा हृदयरोग असो. दुसरं मोठं कारण म्हणजे शरीराचा डीएनएचं सतत विभाजन होत जाणं. यामुळे आजार जास्त प्रभाव करतात. त्यामुळे शरीर आणि अवयव साथ देणं सोडतात.

वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे रक्ताचे सॅम्पल घेतले. त्यांचं कम्प्लिट ब्लड काउंड तपासलं गेलं. या टेस्टमध्ये रक्तातील पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्सचं प्रमाण समजतं. घटत्या वयाची ट्रॅजेक्टरी आणि सीबीसीची आकडेवारी मिळून पाहिलं तर समजलं की, कोणत्या वयात कोणता संभावित आजार काय प्रभाव करू शकते. सोबतच शरीर किती प्रकारच्या आजारांसोबत संघर्ष करू शकतो.

हे इंडिकेटर्स शरीराच्या फिजिकल क्षमता दर्शवतात. ज्या लोकांची लाइफस्टाईल चांगली नाही त्यांचा डीओएसआय हे सांगतो की, ते कमी जगतात. डीओएसआयमध्ये नेहमी गंभीर आजारांशी जोडलं जात नाही. याने सामान्य आजारांच्या आधारावरच शरीराच्या वयाची माहिती मिळते. याने समजतं की, मनुष्याचं शरीर कोणत्या दिशेने जात आहे. ते किती दिवस निरोगी राहू शकतं. जर एखाद्या व्यक्तीला काहीच आजार नसेल आणि त्याची लाइफस्टाईल चांगली असेल तर ती व्यक्ती जास्त काळ जगू शकते.

जेव्हा वैज्ञानिकांनी निरोगी लोकांची टेस्ट केली तर समजलं की, त्यांचा डीओएसआय भविष्यात होणाऱ्या संभावित आजारांबाबत तर सांगू शकतो, पण वर्तमानात कोणत्याही आजाराचा इशारा देऊ शकत नाही. कारण त्यांच्या जगण्याची पद्धत चांगली आहे. नंतर वैज्ञानिकांनी डीओएसआयचा स्तर वाढवून पाहिलं. जेणेकरून संभावित वयाचं माहिती मिळवता येईल. कारण डीओएसआय वाढत्या वयासोबत वाढतो. डीओएसआय आणि वाढत्या वयाचा आपसातील संबंध हे दर्शवतो की, जर शरीराचे सर्व अवयव संतुलित प्रकारे काम करत असतील. कोणताही गंभीर क्रॉनिक आजार नसेल. लाइफस्टाईल योग्य असेल तर मनुष्य १२० ते १५० वर्षापर्यंत जगू शकतात. वैज्ञानिकांनी असंही सांगितलं की, भविष्यात कितीही टेक्निक आल्या तरी वाढतं वय कमी केलं जाऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button