हम साथ साथ है..! पालकमंत्री सतेज पाटील

जिल्ह्यातील महायुती अभेद्य असल्याचा निर्वाळश

Satej Patil

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) (Gokul), जिल्हा बँक, महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आम्ही मागील वेळी ठरल्याप्रमाणेच एकत्र ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी रविवारी स्पष्ट केले.

गोकुळसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे व माजी आमदार चंद्रदीप नरके आदी नेत्यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. या नेत्यांसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच पाठिंबा मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गोकुळमध्ये सध्या आ. पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोधाची मोट बांधली होती. दरम्यान, कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. आता गोकुळसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे जानेवारीनंतर बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

यापार्श्वभूमीवर ना. सतेज पाटील म्हणाले. आमची युनिटी कायम आहे. आमच्यातील कोणीही बाहेर जाणार नाही. उलट बाहेरील आमच्या येतील. संस्था, सभासद विश्वासात घेवू. गोकुळसह जिल्ह्यातील निवडणुकांसाठी आम्हीसर्वजण ठरल्याप्रमाणे एकच आहोत.

निवडणुकांची शक्यता आणि दिवाळीनिमित्त जिल्ह्यात भेटीगाठीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. आघाडीत धूसफूस राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. पक्षीय परिघाबाहेर जावून राजकीय समिकरण तयार करुन धक्कातंत्र देण्याचा प्रयत्न दोन्ही आघाडीच्या पातळीवर होणार आहे. ३१ डिसेंबरला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना दिलेली मुदतवाढ संपत आहे. येत्याकाळात राजकीय घडामोडी वेगावणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER